आपला राजकीय प्रवास केवळ ‘राजकीय लोकशाही’वर थांबता काम नये, तो ‘सामाजिक लोकशाही’ स्थापन होईपर्यंत चालू राहिला पाहिजे!
चळवळींमुळे अस्तित्वात आलेले कायदे किंवा घटना दुरुस्त्यांची अनेक उदाहरणे देता येतील. अशी उदाहरणे केवळ दबलेल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मर्यादित न राहता निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देताना, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य, गोपनीयतेचा अधिकार, यांचे आधुनिक आविष्कार अनुभवायला मिळतात. चळवळीतील आयुधे बदलत चालली आहेत, ती नव्याने वाढत चालली आहेत. ही आयुधे जास्त लोकशाहीवादी आहेत.......